
राज्यात दिवसभरात 6185 नवीन कारोना रुग्ण आढळले असून 4089 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.48 टक्के असून आतापर्यंत 16 लाख 72 हजार 627 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 87 हजार 969 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज 85 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्युदर 2.59 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 6 लाख 35 हजार 600 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 8 हजार 550 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 38 हजार 395 व्यक्ती होमक्वॉरंटाइन असून 7248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत़
मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 1,074 रुग्ण
मुंबईत दिवसभरात 1,074 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 313 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत 17 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 756 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 54 हजार 465वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 195 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 12 हजार 588 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 18 लाख 54 हजार 223 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 80 हजार 811 वर पोहोचली आहे.



























































