धक्कादायक! सुनेसोबत लग्न करण्यासाठी वडिलांनी केली मुलाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फरिदकोट

पंजाबमध्ये एका 62 वर्षीय वृद्धाने सुनेसोबत लग्न करण्यासाठी त्याच्या 40 वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील फरिदकोट येथे घडली आहे. हत्येनंतर वडिलांनी मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले व नाल्यात फेकले. याप्रकरणी पोलिसांनी छोटा सिंग या नराधम बापाला अटक केली आहे.

छोटा सिंग याचा मुलगा राजविंदर सिंग याचे जसवीर कौर नावाच्या महिलेसोबत 12 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत. मात्र जसवीरचे छोटा सिंग सोबत सूत जुळले होते. त्यावरून छोटा सिंग व राजविंदर यांची सतत भांडणं होत होती. त्यामुळे छोटाने भाड्याने घर घेऊन जसवीरला तेथे ठेवले होते. यावरून राजविंदर छोटाशी सतत भांडायचा व जसवीरला देखील मारहाण करायचा. त्यामुळे छोटाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री राजविंदर त्याच्या खोलीत झोपलेला असताना छोटाने त्याचा गळा चिरला व त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे त्याने प्लास्टिकच्या पिशवीत भरले व गटारात फेकण्यासाठी जात असतानाच छोटाचा पुतण्या गुरुचरण सिंग याने त्यांना पाहिले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस आले तेव्हा छोटा राजविंदरच्या खोलीतील रक्त साफ करत होता. याप्रकरणी पोलिसांनी छोटावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.