आयटी कंपन्यांत बोंबाबोंब, 63 हजार 759 कर्मचाऱ्यांची कमतरता

देशातील आयटी कंपन्या टीसीएस, इन्पहसिस आणि विप्रोमध्ये सध्या कर्मचाऱयांची बोंबाबोंब सुरू आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर झाली असून या तिन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्षातील कर्मचाऱयांचा खुलासा केला आहे. या तीन पंपन्यांमध्ये जवळपास 63 हजार 759 कर्मचारी कमी असल्याची माहिती समोर आली आहे. टीसीएस कंपनीमध्ये 13,249 कर्मचाऱयांची कमतरता आहे. इन्पहसिस कंपनीमध्ये 25,994 कर्मचाऱयांची तर विप्रो पंपनीमध्ये 24,516 कर्मचाऱयांची कमतरता आहे. इन्पहसिसचा 23 वर्षांत पहिल्यांदा हेड काऊंट कमी झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात इन्पहसिसचा हेड काऊंट 317,240 आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5 टक्के कमी झाला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीचा हेड काऊंट 343,234 होता. या तिन्ही पंपन्यांच्या एकूण हेड काऊंटमध्ये 63,759 ची कमी आली आहे. एन्ट्री लेवलवर हायरिंगमध्ये घसरण आणि हायरिंग प्रोसेसचा वेग कमी झाल्याने हेड काऊंटमध्ये घसरण झाली आहे.