६४ लोकप्रतिनिधींवर अपहरणाचे गुन्हे; भाजप आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात खासदार आणि आमदार मिळून ४ हजार ८५६ लोकप्रतिनिधी आहेत. त्यापैकी २१ टक्के म्हणजे १ हजार २४ लोकप्रतिनिधींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर १ हजार २४ पैकी ६ टक्के म्हणजे ६४ लोकप्रतिनिधींवर अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ५६ आमदार तर ८ खासदार आहेत. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोशिएशन पॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने निवडणूक आयोगालाा दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भाजपच्या सर्वाधीक १६ लोकप्रतिनिधींवर अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

अहवालानुसार बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधीक लोकप्रतिनिधींवर गुन्हो दाखल झाले आहेत. तेथे ९ आमदारांवर गुन्हे दाखल आहे. तर महाराष्ट्रात ८ तर पश्चिंम बंगालमध्ये ५ आमदारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. लोकसभेच्या ५ आणि राज्यसभेच्या तीन खसदारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.त्यात आरजेडीचे दोन, एलजेपी, एनसीपी आणि एका अपक्ष खासदराचा समावेश आहे. तर भाजप आणि सपाच्या प्रत्येकी एका खासदरावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

table-1|

table-2