
सामना प्रतिनिधी, नाशिक
शिवसेना आमदार योगेश घोलप यांच्या पाठपुराव्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघाला मुलभूत सुविधा योजनेंतर्गत पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे 65 गावांच्या विकासाला मदत होईल. ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविल्या जाव्या यासाठी आमदार घोलप यांनी शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने विविध कामांना मंजुरी दिली आहे.
मतदारसंघातील जाखोरी, नानेगाव, शेवगेदारणा व दुडगावला चौक सुशोभिकरण होणार आहे. मुंगसरा, मातोरी, तळेगाव, महिरावणी, गंगापाडळी, विंचूरगवळी, चांदगिरी, पिंपळगाव गरुडेश्वर, जातेगाव, गोवर्धन, शिलापूर, दोनवाडे, चांदशी, बेलतगव्हाण, आंबेबहुला, रायगडनगर, गणेशगाव, दरी, वंजारीवाडी येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल.
बेलतगव्हाण, सारूळ, सय्यद पिंप्री, दरी, वंजारवाडीत मुख्य रस्ता काँक्रिटीकरण; एकलहरे गाव-पागेरे वस्ती, चांदशी कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. गिरणारे, लाखलगाव, देवरगाव, महादेवपूर, दुगाव, विल्होळीतील बजरंगवाडीत, नागलवाडीत पळसे, गोविंदपूरला सभामंडप, तर सामनगावात व्यायामशाळा बांधण्यात येईल. मानोरी, पळसे, शिंदे, जाखोरी, चांदगिरी, महिरावणी, दरी, ओढा, तळेगाव अंजनेरी, मोहगाव, देवरगाव, पिंपळद, गोवर्धन, महादेवपूर, सामनगाव, बेलतगव्हाण, राजेवाडी, गंगाम्हाळुंगी, रायगडनगर, दहेगाव, गिरणारे, दुगाव, लाडची, जातेगाव, राजूरबहुला, आंबेबहुला, यशवंतनगर, दुडगाव, पिंपळगाव ग. मध्ये हायमास्ट लाईट लावले जातील.


























































