अकोला जिल्ह्यातील कारागृहात 68 कैद्यांना कोरोनाची लागण, तुरुंगातच विलगीकरण

475

अकोला जिल्ह्यातील कारागृहात 68 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहात एकूण 300 कैदी आहेत. सर्व कैद्यांना तुरुंगातच विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील कारागृहात 50 कैद्यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.  बहुतांश कैद्यांमध्ये  कोरोनाची लक्षणे नाहीत. 24 जून रोजी 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज 50 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 68 वर पोहोचली आहे.  सर्व कैद्यांना तुरुंगातच क्वारंटाईन करण्यात आली असून सर्व वैद्यकीय सुविधा पुरवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तुरुंगात सध्या 300 कैदी आहेत. तुरुंगात नवीन कैदी आणले नसल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या