
सामना ऑनलाईन । मुंबई
जगभरात इंटरनेट ही सेवा ही अपरिहार्य गोष्ट झाली आहे. इंटरनेट ही आता चैन नसून जीवनावश्यक गरज झाली आहे. परंतु या अशा जीवनाश्यक गरजेबद्दल पाकिस्तानमधील 69 टक्के लोकांना कल्पनाच नाही. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रात एका सर्वेक्षणाच्या अहवालात ही माहिती दिली आहे.
श्रीलंकेच्या लाईनर एसिया या या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार 15 ते 65 वयोगटातील 69 टक्के लोकांना इंटरनेट ही संकल्पनाच माहित नाही. 2017 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान हे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात २ हजार कुटुबांना प्रश्न विचारले गेले. इंटरनेटबद्द्ल माहिती असलेल्यांची संख्या ही केवळ 31 टक्के असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. इंटरनेटबाबत जागृकता नसल्याने इंटरनेटचा वापर कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे.



























































