
मुंबई उपनगरात किडनी रुग्णांची डायलिसिस मशीनची गरज ओळखून महापालिका मॅटर्निटी होम, डिस्पेन्सरीत 75 डायलिसिस मशिन्स उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून उपनगरातील किडनी रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिकेच्या डिस्पेन्सरी व प्रसूतिगृहे असलेल्या गुंडेचा कंपाऊंड, अंधेरी (प.), ओशिवरा गाव, वीरा देसाई रोड येथे 8 मशिन्स, कांदिवली (प.), येथील डहाणूकरवाडी, डिस्पेन्सरीसाठी 14 मशीन, विंडमेरेजवळ गोरेगाव येथे-6 मशिन्स, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, किरोळ गाव, घाटकोपर येथे 12 मशीन, मातोश्री रमाबाई ठाकरे मॅटर्निटी होम, साईनाथनगर, घाटकोपर येथे 22 मशिन्स, ओशिवरा गाव, आदर्शनगर, लिंक रोड येथे 13 मशीन्स अशा एकूण 75 डायलिसिस मशीनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर किडनी रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात, नर्सिंग होममध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही. त्यांना पालिकेच्या मॅटर्निटी होम, डिस्पेन्सरीमध्ये माफक दरात डायलिसिसची सुविधा मिळणार आहे.





























































