
राज्याच्या प्रशासनात बदल्यांचे सत्र सुरुच असून आज 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे राज्याच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर नितीन पाटील यांची राज्याच्या कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. तर
नितीन पाटील (आयएएस:एससीएस:2007): आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई येथे कार्यरत असलेले अधिकारी नितीन पाटील यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ए. बी. धुळज (आयएएस:एससीएस:2009): महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ए. बी. धुळज यांची इतर मागासवर्गीय (ओबीसी) बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लहू माळी (आयएएस:एससीएस:2009): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी असलेले लहू माळी यांची नियुक्ती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता नवी मुंबई विभागाच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
बाबासाहेब बेलदार (आयएएस:एससीएस:2015): अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग येथे कार्यरत असलेले बाबासाहेब बेलदार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.
मुरुगनाथम एम. (आयएएस:आरआर:2021): यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया येथे कार्यरत असलेले मुरुगनाथम एम. यांची नियुक्ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड येथे करण्यात आली आहे.
आदित्य जिवणे (आयएएस:आरआर:2021): मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड येथे कार्यरत असलेले आदित्य जिवणे यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण (MAHADISCOM), छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे.
मिन्नू पी. एम. (आयएएस:आरआर:2021): सहायक जिल्हाधिकारी, भटकुली-तिवासा उपविभाग, अमरावती येथे कार्यरत असलेल्या सौ. मिन्नू पी. एम. यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया येथे करण्यात आली आहे.
मानसी (आयएएस:आरआर:2021: सहायक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या सौ. मानसी यांची नियुक्ती महानगरपालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर येथे करण्यात आली आहे.