
मध्य प्रदेशातील देवास जिह्यातील एका फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात 200 महिला काम करत होत्या. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल दु-ख व्यक्त केले असून राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4-4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.



























































