बनावट ई-मेल पाठवून कंपनीला गंडा

बनावट ईमेल पाठवून कंपनीची 8 लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्या दोघांना अंधेरी पोलिसांनी बिहारच्या नक्षलग्रस्त भागातून अटक केली. नीरज सिंग राजेंद्र सिंह राठोड आणि धर्मेंद्र पांडे अशी त्याची नावे आहेत. पांडे हा नुकताच एका गुन्ह्यात तिहार जेल मधून सुटून आला होता. त्या दोघांच्या अटकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुह्याची उकल करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे.