चित्रपटांची होम डिलिव्हरी! लक्ष्मी बॉम्ब, भुज, सडक 2, दिल बेचारा हॉटस्टारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे थिएटर पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे बॉलीवूडच्या बड्या कलाकारांनी आपले सिनेमे थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘भुज’, ‘सडक 2’, ‘दिल बेचारा’, ‘द बिग बुल’, ‘खुदा हाफिझ’, ‘लूटकेस’ हे सिनेमे डिजीटल रिलीज होणार असल्याची घोषणा नुकतीच डिस्नी प्लस हॉटस्टारने केली आहे.

‘बॉलिवूड की होम डिलीव्हरी’या उपक्रमाअंतर्गत जुलै ते ऑक्टोबरदरम्यान या सिनेमाचे प्रीमियर होणार आहेत. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन आदी कलाकारदेखील उपस्थित होते. सुशांतचा ’दिल बेचारा’ हा चित्रपट 24 जुलैला रिलीज होणार असून हा चित्रपट फुकट दाखवण्याचा निर्णय हॉटस्टारने घेतला आहे.