बुलढाण्यात आढळले कोरोनाचे 86 रुग्ण, 45 रुग्ण कोरोनामुक्त

बुलढाणा जिल्ह्यात आज कोरोनाचे 86 रुग्ण सापडले आहेत. तसेच 45 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 77 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 161 तर रॅपिड टेस्टमधील 38 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 199 अहवाल निगेटिव्ह आहेत.

आज 45 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  जिल्ह्यात आज अखेर एकूण 2557 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 1634 कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 882 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत 41 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या