संभाजीनगरातही तेच… टक्का घसरला, मुलीच सरस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर विभागाचा निकाल 87.29 टक्के लागला असून गतवर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का घसरला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांत मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्ण विद्यार्थिनींचे प्रमाण 90.86 टक्के आहे. संभाजीनगर शिक्षण मंडळाअंतर्गत यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या 1 लाख 62 हजार 646 विद्यार्थ्यांत 62 हजार 84 विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी 56 हजार 295 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी 90.86 आहे. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 85.09 टक्के आहे.   पुनर्परीक्षा दिलेले 2 हजार 36 विद्यार्थी उत्तीर्ण  झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 33.76 आहे असे यावेळी सांगण्यात आले.  शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 94.44 टक्के  निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा 90.60, कला-78.83 एचएससी व्हेकेशनलचा 78.72 टक्के निकाल लागला आहे.