वृद्धाची फसवणूक करणाऱयाला अटक  

गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची 9 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली. रवी शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या महिला आहेत. 2019मध्ये महिलेचे वडील हे रवी ज्या बँकेत कामाला होता तेथे गेले. रवीने महिलेचे वडील, आई आणि बहिणीचा विश्वास संपादन केला. तो बँक खात्याचे बनावट स्टेटमेंट घरी जाऊन देत असायचा. तसेच बनावट एक्सेल शीट बनवून गुंतवणुकीच्या पोर्टपहलिओमध्ये चार पट वाढ झाल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. काही दिवसांपूर्वी तक्रारदार या बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या. तेव्हा त्याच्या खात्यात रक्कम नसल्याचे त्याच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अखेर पोलिसांनी रवीला अटक केली. रवीने गेल्या वर्षी नोकरी सोडली होती. त्याने बँकेत पह्न नंबरदेखील बदलला होता. जेणेकरून पैशाच्या व्यवहाराची सूचना तक्रारदार यांना मिळू नये. रवीने नोकरी सोडल्यानंतर फसवणूक करणे सुरूच ठेवले होते.