
खेळताना तोल जाऊन पिठाच्या बुट्टीत पडल्याने चिमुकल्याचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडली आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने) असे या बालकाचे नाव आहे.
सुप्रिया यमगर या मुलगा कृष्णराजला घेऊन वडणगे येथील आपल्या आजीकडे आल्या होत्या. काल सायंकाळी कृष्णराज वॉकर घेऊन चालत असताना तोल जाऊन पिठाच्या डब्यात पडला. त्यामुळे त्याच्या नाका-तोंडात पीठ गेले आणि ते चिकटून बसले. दरम्यान, आजीने त्याला तत्काळ बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.



























































