नववी, अकरावी परीक्षा रद्द; सर्व विद्यार्थी पास!

पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय पास करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत कार्यक्रम आखणार आहे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा निर्णय केवळ राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित शाळांसाठीच लागू असेल.

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाइनच

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा सध्या तरी ऑफलाइन घेतल्या जाणार असून तूर्तास तरी यात बदल होणार नाही. मात्र राज्यातील काही विद्यार्थी, पालकांची ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी लक्षात घेता यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या