
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी परिसरात रात्री मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळाच्या या तडाख्यात नेरी येथील 92 चिमण्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. नेरी येथील एका लिंबाच्या झाडावर शेकडो चिमण्या नेहमीच रात्री विसावा घ्यायच्या. रात्री अचानक वादळ आल्याने निष्पाप चिमण्यांचा बळी गेला. वादळात 92 निष्पाप चिमण्यांचा जिव गेला तर पर्यावरण संवर्धन समितीच्या सतर्कतेने काही चिमण्यांचा प्राण वाचविण्यात यश आले. पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य सुशांत इंदोरकर, सुदर्शन बावणे, राहुल गहुकर, मयुर कुंदोजवार यांनी काही चिमण्यांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे पक्षीप्रेमी मध्ये हळहळ व्यक्त व्यक्त होत.



























































