
सामना ऑनलाईन । अलप्पुझा
केरळमधल्या अलप्पुझा जिल्ह्यात राहणाऱ्या कार्तियानी अम्मा या 96 वर्षांच्या आजींनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन राज्यसरकारने केले आहे. केरळ सरकारकडून सारक्षता अभियानांतर्गत ‘अक्षरलक्षम’ योजना चालवण्यात येते. या मोहिमेतंर्गत परीक्षा देणाऱ्या त्या सर्वात ज्येष्ठ महिला होत्या. या परीक्षेत या आजी 98 टक्के गुण मिळवून टॉपर ठरल्या आहेत. या परीक्षेत राज्यातून 43 हजार परीक्षार्थी होते. या परीक्षेत लेखन, पाठांतर आणि गणीत या विषयांचा समावेश असतो.यावर्षी ऑगस्टमध्ये ही परीक्षा झाली होती. त्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात अम्मा टॉपर ठरल्या आहेत. तसेच एका विषयात त्यांनी 100 गुण मिळवले आहेत.
Kerala:At 96 yrs,Karthiyani Amma of Alappuzha Dist.scores 98/100 marks in ‘Aksharalaksham’ literacy program of Kerala State Literacy Mission.She was the oldest student appearing for the exam. Approx 42933 ppl cleared the exam who were tested on skills incl. reading, writing&maths pic.twitter.com/edvcKywmf4
— ANI (@ANI) October 31, 2018
याआधीही अम्मांनी बऱ्याच परीक्षा दिल्या असून त्यात चमकदार कामगिरी केली आहे. वयाची 100 वर्षे पूर्ण करण्याआधी 10 वीची परीक्षा उतीर्ण करण्याचे आम्मांचे ध्येय आहे. या परीक्षेत 80 कैदीही सहभागी झाले होते. तसेच अनुसूचित जातीचे 2420 जण तर जमीतींचे 946 परीक्षार्थी सहभागी झाले होते. 96 वर्षांच्या या आजींचा आर्दश विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा असे आवाहन राज्य सरकारने विद्यार्थ्यांना केले आहे. शिक्षणाचे कोणतेही वय नसते हेच या आजींना आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.


























































