घाटकोपर छेडानगर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या भयंकर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू आणि 74 जण गंभीर जखमी झाले असताना मुंबईभरात रेल्वे हद्दीत तब्बल 99 धोकादायक होर्डिंग असल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे ही धोकादायक होर्डिंग तातडीने हटवा, अशी नोटीस पालिकेने रेल्वे आणि संबंधितांना डिझास्टर अॅक्टखाली बजावली आहे. हे होर्डिंग हटवले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
मुंबईत सोमवारी सायंकाळी 4 वाजता अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर पूर्व छेडानगर येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱयासाठी उभे असलेल्या सुमारे 100 जणांवर भलेमोठे होर्डिंग कोसळले. हे महाकाय होर्डिंग उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाऊंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने रेल्वे हद्दीमधील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये तब्बल 99 ठिकाणची होर्डिंग ‘ओव्हर साइझ’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एफ/उत्तर घाटकोपर, माटुंगा, वडाळय़ात सर्वाधिक 22 धोकादायक होर्डिंग असल्याचे समोर आले आहे.
छेडानगर येथे लॉर्ड सिक्युरिटी सर्व्हिसेस याला अयोग्य कार्यपद्धतीमुळे रेल्वेने काळय़ा यादीत टाकले होते, मात्र या पंत्राटदाराने वेगळी पंपनी स्थापन करून हे काम मिळवले. यासाठी त्याने टेंडर प्रक्रियाही राबवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बेकायदेशीर होर्डिंगबाबत पालिकेने जाहिरातदाराला नोटीसही पाठवली होती.
पंपदेखील बेकायदा
जाहिरात आणि पंप उभारण्यात आलेली जमीन राज्य सरकारकडून पोलीस हाऊंसिंगला दिली होती. त्यांनी ती जागा लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांकडून ही जागा पंप उभारण्यासाठी टेंडर काढून देण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेला पंपदेखील बेकायदेशीर असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पंपचालक फरार असून त्याच्याविरोधात पालिकेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
मृतांची संख्या 14 वर
भरत वसंत राठोड (25), चंद्रमणी खारपालू प्रजापती (45), दिनेशकुमार जैस्वाल (44), मोहम्मद अक्रम (48), बसीर अहमद अली हनीफ शेख (60), दिलीप कुमार पासवान (30), पुर्णेश बाळकृष्ण जाधव (50), सतीश बहादुर सिंग, फहीम खलील खान (20), सूरज महेश चव्हाण (19), धनेश मास्टर चव्हाण (48), हंसनाथ रामजी गुप्ता (68), सचिन राकेश कुमार यादव (23), राजकुमार मकुन दास (20)
जोखमीचे बचावकार्य सुरूच
महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने काही गाडय़ादेखील दबल्याचे समोर आले आहे. यामध्ये गाडय़ांच्या टाकीमधील पेट्रोलची गळती झाल्याची भीती आहे. शिवाय जवळच पेट्रोल पंपही आहे. त्यामुळे भलेमोठे लोखंडी रॉड हटवण्यासाठी गॅस कटरचा वापरही करताना मर्यादा आल्या. त्यामुळे हायड्रोलिक कटर, प्लाझ्मा कटरने हे काम करण्यात आले.
तीनही बेकायदा होर्डिंग हटवले
छेडानगर दुर्घटना घडलेल्या भागातच आणखी तीन महाकाय होर्डिंग बेकायदेशीर उभारण्यात आले होते. हे होर्डिंग पालिकेने आज सकाळपासून काम करीत हटवले आहेत. दरम्यान, पालिकेने ‘बेस्ट’सह मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अशा मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या परिसरात लावलेल्या होर्डिंगची यादी मागवली असून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
बेकायदा होर्डिंग हटवा – आयुक्त
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. मुंबईच्या सर्व वॉर्डमधील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक होर्डिंग हटवण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
होर्डिंग कंपनीचा मालक भिंडे फरार
हार्ंडग दुर्घटनाप्रकरणी युगो पंपनीचा मालक भावेश भिंडे, युगो पंपनीचे संचालक, कर्मचारी आणि सिव्हिल पंत्राटदार यांच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडे हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. पोलिसांचे पथक आज भिंडेच्या घरी आणि कार्यालयात गेले होते, मात्र तो तेथे मिळून आला नाही.
घाटकोपर येथे रेल्वे पोलिसांच्या जागेत पेट्रोलपंप आहे. पेट्रोलपंपाजवळ एक मोठे हार्ंडग होते. सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱयामुळे समता कॉलनी येथील रेल्वे पोलीस पेट्रोलपंपच्या जवळ हार्ंडग पडल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. 64 x 50 मीटर लांब रुंदीचा लोखंडी सांगाडा पेट्रोलपंपावर पडला. घटना घडली तेव्हा काही जण हे पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी उभे होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी ऑपरेशन हाती घेऊन जखमींना बाहेर काढले. घटना घडल्यानंतर काही तासांनी चंद्रमणी प्रजापती, मोहमद अक्रम, दिनेशकुमार जयस्वाल, भरत राठोडला बाहेर काढले. त्या चौघांना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
युगो मीडियाचे मालक भावेश भिंडे, पंपनीचे संचालक, कर्मचारी, पंत्राटदार याच्या विरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्या हार्ंडगचे स्ट्रक्चर ऑडिट झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ती जागा रेल्वे पोलिसांची
छेडानगर येथे लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कल्य2ाण निधी संस्थेमार्फत आणि राज्य पोलीस महासंचालक याच्या परवानगीने तेथे बीपीसीएल पंपनीचे पेट्रोलपंप सुरू होते. 2021 साली रेल्वेचे तत्कालीन पोलीस आयुक्त पैसर खालिद यांच्या आदेशाने तो युगो मीडिया या पंपनीला भाडेतत्त्वावर ती जागा 10 वर्षांसाठी फलक उभारण्यासाठी परवानगी दिली होती. पालिकेच्या तक्रारीनुसार जाहिरातदारास फलक काढून टाकण्यासंबंधी पत्र रेल्वे आयुक्तालय कार्यालयाकडे आले आहे. त्यावर रेल्वे आयुक्तालयाने कारवाई सुरू केली असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.