दलित म्हणजे कुत्रे! केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे बरळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ananth-kumar-hegde

सामना ऑनलाईन । बंगळुरू

देशातील दलित म्हणजे कुत्रे आहेत, असे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे हे आज बरळले. अनंतकुमार हे नेहमीच राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेविरोधात वक्तव्य करत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज संतप्त दलित संघटनांनी बेल्लारी येथे त्यांची गाडी अडवून निषेध व्यक्त केला. त्यामुळे पारा चढलेल्या हेगडेंनी दलितांबाबत वरील अपशब्द वापरले असल्याचा दावा अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे.

आम्ही देशाची राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत. तसेच धर्मनिरपेक्ष लोकांना आपल्या बापजाद्यांच्या रक्ताची ओळख नसते, अशी वादग्रस्त विधाने नुकतीच अनंतकुमार यांनी केली होती. त्यामुळे दलित समाजामध्ये संतापाची भावना आहे. त्यानुसार आज दलितांनी सायंकाळी अनंतकुमार यांची गाडी अडवत आपला राग व्यक्त केला. तेव्हाच हेगडेंनी दलितांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असल्याचे प्रकाश राज यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

अनंतकुमारांचं आता अति झालं
अनंतकुमार हे वारंवार दलित समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. आता तर त्यांनी दलितांना कुत्रे म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. हे आता अति झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करून त्यांना पदावरून हाकलावे अन्यथा हेगडेंच्या वक्तव्यांना तुमचा छुपा पाठिंबाच आहे, असे मानले जाईल, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.