मोदी प्रचारसभेत बोलणारे पंतप्रधान, चंद्राबाबू यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसभेत बोलणारे पीएम असून त्यांनी आतापर्यंत दिलेली कोणतीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आगामी २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येणार नाही, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

तेलगू देसम पक्षाची (टीडीपी) वार्षिक बैठक, महानाडूचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रात सत्ता स्थापन करण्यात टीडीपीने नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. देशातील राजकीय समीकरणे बदलून टाकण्याची ताकद ‘टीडीपी’मध्ये आहे. येत्या काळात भाजपला रोखण्यासाठी टीडीपीला अनुकुल विचारसरणीच्या पक्षाला बरोबर घेऊन २०१९मध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राज्याला विशेष दर्जा न दिल्यामुळेच आम्ही ‘एनडीए’तून बाहेर पडल्याचे नायडू म्हणाले.