
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधेरी (पूर्व) येथे एका हॉटेलमध्ये हिंदुस्थानी महिला आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेंडला ते अविवाहीत असल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुम देण्यास नकार दिला आहे. एका महिन्यापूर्वी या दोघांनी ऑनलाईन बुकिंगद्वारे हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. परंतु आता ‘नो-कपल पॉलीसी’चे कारण सांगत त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आले असून हॉटेलने बुकिंगचे पैसेही परत देण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय महिला दिल्लीची असून तिचा ३१वर्षीय प्रियकर अमेरिकेचा आहे. या दोघांनी हिंदुस्थानात सुट्टी घालवण्यासाठी एक महिन्या आधी मुंबईतील अधेरीस्थित एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. प्रियकर पहिल्यांदा आपल्याला भेटायला येत असल्याने महिलेने ही रुम बूक केली होती. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ‘विमानतळावरुन आम्ही दोघे हॉटेलमध्ये गेलो. तेथे आमचे ओळखपत्र दाखवताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी तुम्ही अविवाहीत आहात असे कारण देऊन खोली देण्यास नकार दिला.’
हॉटेल कर्मचाऱ्यांनी आम्हाला एक बोर्ड दाखला. या बोर्डवर कपल्सला परवानगी नाही असे लिहिण्यात आले होते. मुंबई येण्याच्या आधी आम्ही दिल्ली, जयपुर आणि उदयपूर या शहरात गेलो होतो, परंतु तिथे आम्हाला आशा कोणत्या अडचणींचा सामोरे जावे लागले नाही. कपल्सला हॉटेलमध्ये रुम देऊ नये असा कोणताही कायदा नसताना आम्हाला रुम नाकारण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे



























































