पुरंदरमधील एखतरवाडी, मुंजरवाडी, वागदरवाडी, आडाची वाडी ग्रामपंचायतींवर भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

जिल्ह्यात पुरंदरमधील एखतरवाडी, मुंजरवाडी, वागदरवाडी, आडाची वाडी ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद यश संपादन करून भगवा फडकवला, तर जुन्नर तालुक्यातील बेल्हेच्या सरपंचपदी शिवसेनेचे राजाभाऊ गुंजाळ निवडून आले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल मतदान होऊन आज मतमोजणी झाली. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे राजाभाऊ गुंजाळ हे निवडून आले.

सरपंचपदासाठी सहा उमेदवार आपापले नशीब आजमावत होते. शिवसेनेचे राजाभाऊ गुंजाळ यांच्या श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी ९ जागा जिंकून आपले वर्चस्व राखले. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत इतर ५ उमेदवारांना धूळ चारली. बेल्हे ग्रामपंचायतीच्या ६७३२ मतदारांपैकी ५३३२ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी थेट सरपंचपदासाठी राजाभाऊ गुंजाळ यांना २४१९, तर प्रदीप पिंगट यांना १९४२ मते मिळाली. संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रदीप पिंगट यांनीदेखील कडवी लढत दिली.

पुरंदरमध्ये ३ ग्रामपंचायतींत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकूण ४१ उमेदवार, तर सदस्यासाठी २२२ उमेदवार निवडणूक िंरगणात होते. निवडणूक आलेल्या सरपंच उमेदवारांपैकी ५ काँग्रेस, ५ राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. एखतपूर मुंजवाडी, वागदरवाडी आणि आडाचीवाडी या तीन गावांत शिवसेनेने निर्विवाद यश संपादन केले.

निवडून आलेले सरपंच व त्यांची गावे याप्रमाणे (१) ज्ञानेश्वर कोंडिबा वचकल वीर (२) उद्धव भाऊसाहेब भगत -राजुरी (३) महादेव भालचंद्र बोरावके -माळशिरस (४) मोहन साधू कुदळे -रानमळा (५) शहाजी सदाशिव जगताप – कोथळे (६) अमोल शंकर खवले -वाल्हा (७) जयश्री दत्तात्रय चव्हाण -सुकलवाडी (८) कृष्णा रामचंद्र झुरंगे -एखतपूर मुंजवडी (९) उषा प्रदीप पवार -वागदरवाडी (१०) दत्तात्रय यशवंत पवार आडाचीवाडी (११) नामदेव गंगाराम कुंभारकर -वनपुरी (१२) राजेंद्र नामदेव भोसले -भोसलेवाडी आणि (१३) संतोष बाळासाहेब कुंभारकर -उदाचीवाडी.

शिरूर तालुक्यात पाचपैकी तर्डोबावाडी, अण्णापूर, शिरूर ग्रामीण तीन ग्रामपंचायतींवर, तर वाजेवाडी येथे भाजपा पुरस्कृत पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले, तर दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे सरपंच निवडून आले आहे, तर वाजेवाडी ग्रामपंचायत निवडणूकमध्ये भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले आहेत. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी विठ्ठल घावटे हे त्यांच्या पक्षाचे निवडून आले असून, त्यांना १७८३ मते मिळाली असून, राष्ट्रवादीचे नामदेव जाधव यांना १७५३ मते मिळाली असल्याने केवळ जाधव यांचा तीस मतांनी पराभव झाला आहे.

सरदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत विलास र्विडले हे निवडून आले. र्विडलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी राजेंद्र ऊर्फ तात्या दसगुडे हे निवडून आले आहेत. अण्णापूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सरपंचपदी दत्तात्रय कुरुंदळे व सर्व सदस्य निवडून आले.

तर्डोबावाडी ग्रामपंचायत सर्व बिनविरोध निवडून आले आहेत. या ठिकाणी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपला गड राखला आहे, तर वाजेवाडी येथे धर्मराज वाजे यांची अनेक वर्षांची सत्ता यावेळी गेली आहे. तेथे भाजप पुरस्कृत मनोज वाजे यांची सत्ता आली आहे.

आमदार बाबूराव पाचर्णे यांची तर्डोबावाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, या ग्रामपंचायतमध्ये बाजार समिती संचालक, खरेदी- विक्री संचालक संतोष मोरे यांच्या पत्नी धनश्री संतोष मोरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

खेड तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर उर्वरित दहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २६ उमेदवार रिगंणात होते, तर दहा ग्रामपंचायतींच्या ९७ सदस्यांच्या एकूण जागांपैकी ५३ सदस्य बिनविरोध निवडून आले. वहागाव – सुदाम गोमाजी पवार (सरपंच), आडगाव – प्रकाश बाजीराव गोपाळे ( सरपंच ), सुपे – दत्तात्रय प्रकाश मोहन (सरपंच), मोरोशी -जयश्री रोहिदास नांगरे (सरपंच), डेहणे – दत्तात्रय िंचधू खाडे (सरपंच), वाळद-रुचिरा सखाराम पोखरकर (सरपंच), तिफणवाडी -दीपक गंगाराम कडलग (सरपंच), सातकरस्थळ- संजीवनी मितेश थिगळे (सरपंच), कोहिणकरवाडी – वैशाली पांडुरंग कोहिणकर (सरपंच), सांडभोरवाडी – अरुण राघू थिगळे ( सरपंच), निवडून आले.