रेल्वे रुळांवर झेप घेत ‘जीवन’ संपवलं, पोलीस शिपायाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

वरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या जितेंद्र उर्फ जीवन देवमन सोनवणे (वय-२८) तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी निश्चित कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

अप रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह सापड्यानंतर चौकशी करण्यात आली. त्याची माहिती काढून आईवडिलांना घडलेली घटना कळवण्यात आली. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन बहिणी असा परीवार आहे.

जीवनचे वडील देवमन सोनवणे रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. जीवनची वर्षभरापूर्वीच वरणगाव पोलिसात नियुक्ती झाली होती. जीवन यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.