सहायक राज्यकर आयुक्ताविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नागपूर येथील मॅकनेली भारत इंजिनियरिंग लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्षाकडे दोन कोटींची लाच मागणाऱया सहायक राज्यकर आयुक्ताविरुद्ध ऍण्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला. सोपान सूर्यवंशी असे या सहायक राज्यकर आयुक्ताचे नाव असून त्याला यासाठी मदत करणाऱया सेवानिवृत्त विक्रीकर उपआयुक्त डी. व्ही. रेठरेकर यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

मॅकनेली भारत इंजिनीयरिंग लिमिटेड या कंपनीचे नागपूरमध्ये कार्यालय आहे. सप्टेंबर २०१६ साली सहायक राज्यकर आयुक्त सोपान सूर्यवंशी यांनी आपल्या पथकासह या कार्यालयात छापा टाकला. वॅट रिटर्नमध्ये दोष काढून कंपनीला ३ कोटी ५५ लाखांचा अतिरिक्त कर लावला. कंपनीने याबाबत सल्ला घेण्यासाटी लिगल प्रॅक्टिशनर आणि माजी विक्रीकर उपआयुक्त डी. व्ही रेठरेकर यांना नेमले. त्यांनीही अतिरिक्त कर भरण्याचा सल्ला दिला. कंपनीने हा अतिरिक्त कर भरला. कंपनीने कर भरल्यानंतरही सूर्यवंशी यांनी कंपनीचे उपाध्यक्षांना मोबाईलवर संपर्प केला. जबाब नोंदविण्यासाठी कार्यालयात येण्यासाठी आणि संचालकांची माहिती पाठविण्यासाठी त्यांनी मेसेज केला. रेठरेकर यांना मध्यस्थी घेऊन छापा टाकला त्यावेळी केलेल्या मदतीसाठी दोन कोटी रुपये मागितले होते.