
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारचा पैशाचा ‘तमाशा’ सुरूच आहे. बुधवारी पेट्रोल, डिझेल लिटरमागे १ पैशाने स्वस्त केल्यानंतर गुरुवारी पेट्रोल लिटरमागे ७ पैसे तर डिझेल लिटरमागे ५ पैसे स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ८६.१६ रुपये, तर डिझेलचा प्रति लिटरचा ७३.७३ रुपये झाला आहे.
‘बेस्ट’वर २६ कोटींचा बोजा
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे ‘बेस्ट’वर तब्बल २६.१३ कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे. परिणामी आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने ‘बेस्ट’च्या इंधनावरील कर कमी करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
एसटीचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
डिझेलची सातत्याने काढत असलेले दर, कर्मचाऱयांच्या केतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा तसेच महामार्गाकरील टोल दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता एसटी प्रशासनाने ३० टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताक एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे सादर केला आहे. त्यांनी संमती दिल्यानंतरच प्रत्यक्ष भाडेवाढ होणार आहे.
रॉकेलही अडीच रुपयांनी महाग
पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनचालकांचे कंबरडे मोडले असतानाच रॉकेलही तब्बल अडीच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना जिणे नकोसे झाले आहे. जानेवारीत २४ रुपये लिटर असणारे रॉकेल मे महिन्याच्या सुरुवातीस २६ रुपये १० पैसे झाले तर महिनाखेरीस २६ रुपये ५७ पैसे लिटर झाले आहे.


























































