
सामना ऑनलाईन, नाशिक
राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस स्कूलमधील नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱया शिक्षकाला पालकांनी बेदम चोप दिला. त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इयत्ता नववीत शिकणाऱया विद्यार्थिनीची तिचा शिक्षक सुनील कदम हा गेल्या तीन महिन्यांपासून छेड काढत होता, तिचा विनयभंगही करीत होता. घरच्यांना सांगितल्यास नापास करण्याची धमकीही त्याने दिली होती. कालपासून ही विद्यार्थिनी सुट्टीनंतर शाळेत जाण्यास नकार देत रडत होती. पालकांनी विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडला प्रकार सांगितला. तिच्यासह इतर पालकांनी सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये जाऊन सुनील कदमला बेदम चोप दिला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सदर मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.




























































