सहकाऱ्याकडून लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मनाप्रमाणे गार्ड ड्युटी दिल्याच्या मोबदल्यात सहकाऱ्याकडे एक हजाराची मागणी करणारा पोलीस शिपाई अमोल बावस्कर (२९) ट्रप झाला. बावस्कर हा ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलाच्या मुख्यालय-२ येथे कार्यरत आहे.

दिनकर (नाव बदललेले) हे पोलीस अंमलदार मुख्यालय-२ येथे कार्यरत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या गिरगाव शाखा येथे गार्ड डय़ुटी देण्याची मागणी दिनकर यांनी बावस्करकडे केली होती. त्यानुसार २८ तारखेला बावस्करने त्या ठिकाणी दिनकर यांची गार्ड डय़ुटीसाठी नेमणूक केली. त्यानंतर तुमच्या मनाप्रमाणे गार्ड डय़ुटी दिल्याच्या मोबदल्यात बावस्करने एक हजारची मागणी दिनकर यांच्याकडे केली, मात्र लाच द्यायची नसल्याने दिनकर यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे बावस्करची तक्रार केली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने बावस्करला एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.