घरातील ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> आहारात काळीमिरीचा समावेश केल्याने वजन कमी होणे, अंगाला येणारा अतिरिक्त घाम कमी हेणे, लघवी साफ होण्यास मदत होते.

> दालचिनी खाल्ल्याने बौद्धिक क्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.

> ताण आणि नैराश्यावर मात करण्यासाठी शेपूची भाजी खावी.

> ओरेगॅनोच्या पानांमधील औषधी गुणधर्मामुळे कफापासून आराम मिळतो. तसेच या पानांमध्ये असणाऱया 19 औषधी रसायनांमुळे शरीरातील जिवाणुंच्या वाढीस प्रतिबंध होतो. त्यामुळे ही पाने खावीत.

> आले शरीरातील साखर नियंत्रित ठेवते. तसेच आले खाल्ल्याने ह्रदयविकारातील धोकेही टाळता येतात.

> आजारपणामुळे आलेल्या अशक्तपणावर मात करण्यासाठी आणि खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी लसूण खावा.

> मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथीचे दाणे खावेत.

> रोझमेरी या सुवासिक फुलझाडाची पोने खाल्ल्याने दमा आणि इतर ऍलर्जीची लक्षणे बरी व्हायला मदत होते.

> दातदुखी, दातांचा रंग पिवळा होणे अशा दातांच्या समस्यांवर लवंग गुणकारी आहे.

> मिंटची पाने खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. वजन कमी करण्यासाठीही या पानांचा उपयोग होतो.

> कर्करोग दूर करण्यासाठी हळद गुणकारी आहे.