देव तारी त्याला कोण मारी…८०० फूट खोल दरीत कोसळला तरी वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमित खोत। आंबोली

देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. अशीच काहीशी घटना आंबोली घाटात घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरुन आंबोली दरीत ८०० फूट खोल कोसळूनही संपत महाले (३५) हा युवक बचावला आहे.

मूळ नाशिकचा असलेला संपत कुटुंबासह गोव्याहून नाशिकला येत होता. पण वाटेत लागणाऱ्या आंबोली घाटाचं सौंदर्य पाहून तो हरखून गेला आणि सेल्फी काढण्यासाठी गाडीतून उतरला. पण सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला व तो थेट ८०० फूट खोल दरीत कोसळला. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलिसांची व रेस्क्यू टीमची एकच धावपळ सुरू झाली. एवढ्या खोल कोसळल्यानंतर संपतचे जगणे अशक्य होते. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा सगळ्यांचाच समज झाला. पण संपतचा मृतदेह आणण्यासाठी पोलीस व रेस्क्यू टीम जेव्हा दरीत उतरली तेव्हा त्यांना आश्चर्याबरोबरच सुखद धक्का बसला. कारण एवढ्या फूट खोल खाली कोसळूनही संपतचा श्वास सुरू होता.