
सामना ऑनलाईन । नागपूर
गुरुवारी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुर विमानतळावर आरएसएसच्या स्वयंसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
#WATCH RSS members welcome Former President of India Dr. Pranab Mukherjee on his arrival at Nagpur airport. He is the chief guest at a Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) program tomorrow (Earlier visuals) pic.twitter.com/vmLg23M7ni
— ANI (@ANI) June 6, 2018
प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमात जाणे टाळावे असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते. परंतु मुखर्जी यांनी मात्र ‘मन की बात’ आता ७ जूनला नागपुरात गेल्यावरच सांगेन,’ असे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेस विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.






























































