धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाकडे अजित पवारांनी फिरवली पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या परळी तालुक्‍यातील खासगी कंपनीच्या सौरउर्जा प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठ फिरवल्याने पवार-मुंडे संबंधांबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

गुरुवारी या पूर्वनियोजित प्रकल्पाच्या लोकार्पणाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांनी केली होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार येणार असल्याचे याआधीच जाहीर झाले असल्याने, तशा कार्यक्रम पत्रिकाही छापन्यात आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, गुरुवारी सकाळी मालनाथपूर येथे झालेल्या कार्यक्रमाला अजित पवार न आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसले. अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबतचे निश्चित कारण पक्षांकडून सांगण्यात न आल्याने, धनंजय मुंडे यांनीच या कार्यक्रमाचे लोकार्पण उरकून घेतले. या कार्यक्रमास अजित पवारांनी अनुपस्थिती दाखवल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.