1 / 5
सकाळीच पावसाने दमदार एन्ट्री केल्याने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडाली होती. पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले.
मुंबईत पुढील तीन दिवस पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महानगरपालिकेने सर्तकतेचा उपाय म्हणून ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत.





























































