फादर्स डे कशाला हवा? बिग बींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज जगभरात फादर्स डे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. लहानथोरांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करून फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र फादर्स डे कशाला साजरा करावा, असा प्रश्न विचारला आहे.

पितृदिनानिमित्त आपले वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्या समवेत बिग बी यांनी आपला फोटो शेअर केला आहे. त्यावर ‘फादर्स डे कशाला, माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आई आणि बाबांच्या नावे.. ‘ अशी कॅप्शनही त्यांनी दिली आहे. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.