‘रमजान’मध्ये ६६ दहशतवादी हल्ले! २२ जवान शहीद; १९ नागरिकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

रमजान महिन्यात जम्मू-कश्मीरात एकतर्फी शस्त्रसंधी लागू करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय महागात पडला आहे. ‘रमजान’मध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये तब्बल २६७ टक्क्यांनी वाढ झाली.  ‘रमजान’मध्ये ६६ हल्ले झाले. त्यात २२ जवान शहीद आणि १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

२०१७ मध्ये रमजान महिन्यात नऊ दहशतवादी हल्ले झाले होते. त्यात २२ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नऊ जवान शहीद झाले होते. या वर्षी २०१८ मध्ये १७ मे ते १७ जून या रमजानच्या काळात तब्बल ६६ दहशतवादी हल्ले झाले. २२ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यामध्ये तब्बल २२ जवान शहीद झाले. १९ नागरिकांचा मृत्यू झाला. रमजानपूर्वी १७ एप्रिल ते १७ मे या काळात १८ दहशतवादी हल्ले  झाले होते. रमजानमध्ये दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी रमजानच्या काळात पाकडय़ांनी सीमेवर रोज गोळीबार केला.