
सामना ऑनलाईन । मुंबई
समाजातील वास्तव घटनेकर भाष्य करण्याचा प्रयत्न बऱ्याच कलाकृतींद्वारे केला जातो. अशीच एक एकांकिका म्हणजे ‘२९ सप्टेंबर २००६ रोजी’ नुकताच या एकांकिकेचा पहिला प्रयोग अभिनय कट्टय़ावर पार पडला. या एकांकिकेचे दिग्दर्शन संकेत पाटील यांनी केलेलं असून राजरत्न भोजने यांनी ती लिहिली आहे. या एकांकिकेतून त्यांनी २९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिह्यात खैरलांजी गावात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्यंत अमानुष घटनेकर भाष्य केलंय. संकेत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, पुरोगामीत्वाचा, आधुनिकतेचा डंका पिटवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही जातीधर्माचे जोखड अजूनही उतरलेले नाही. त्यातूनच निर्माण होणाऱया समस्या आणि विविध घटना ऐकायला, वाचायला मिळतात. हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर लोकशाहीवर एकूणच हिंदुस्थानी संविधानावर गदा येऊ शकते.





























































