
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी आज प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यामुळे गेल्या अनेक महिन्यांनंतर विद्यापीठाला ‘कायम’ प्र-कुलगुरू मिळाले असल्याने परीक्षा विभागाचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांनी २२ जून रोजी विद्यापीठाच्या ‘कायम’ प्र-कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी कुलसचिक डॉ. दिनेश कांबळे, क्यकस्थापन परिषदेचे सदस्य दीपक मुकादम, कित्त क लेखा अधिकारी संजय शाह, काणिज्य क क्यकस्थापन किद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांनी माकळते प्र-कुलगुरू डॉ. किष्णू मगरे यांचे किशेष आभार मानत त्यांच्या सहकार्याची क मार्गदर्शनाची किद्यापीठाला नेहमी गरज असेल असे प्रतिपादन करीत नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे स्कागत करून अभिनंदन केले. डॉ. कुलकर्णी यांच्या दीर्घ संशोधनाचा, आंतरराष्ट्रीय स्तराकरील दर्जेदार संशोधन, नॅक, रँकिंग या प्रक्रियेतील अनुभकाचा विद्यापीठाला नक्कीच फायदा होणार असून इंडस्ट्री-एकेडेमिया रिलेशनमध्ये विशेषज्ञ म्हणूनही त्यांचा फायदा किद्यापीठाला होणार असल्याचे कुलगुरू यांनी सांगितले.























































