हरवलेला मुलगा व्हॉट्सअॅपमुळे काही तासात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत । न्हावाशेवा

तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास काहीही अशक्य नाही असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय उरणमध्ये आला आहे. येथील दोन वर्षाचा हरवलेला मुलगा व्हॉट्सअॅपमुळे सापडला आहे. ज्ञानबहाद्दूर नेपाळी असे या दोन वर्षीय मुलाचे नाव असून त्याला पालकांकडे सोपवण्यात आल्याचे उरण पोलिसांनी सांगितले.

उरण शहरातील आंनदनगर येथील मुख्य रस्त्यावर दोन वर्षीय मुलगा त्याच्या सोबत कोणीही नसल्याने त्या ठिकाणी रडक्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे बाजूला असलेल्या जागृत व्यापारी किशन यांनी उरण पोलीस ठाण्यात कळविले. त्याची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी मुलाची तात्काळ चौकशी सुरू केली. परंतु त्याला बोलता येत नसल्याने पालकांचे व त्याचे नाव समजले नाही. पोलिसांनी व्हॉट्सअपवर फोटो अपलोड करून ओळख पटवण्याचे आवाहन केले.

उरण पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने मुलाच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात पोहोचता आले. यावेळी पोलिसांना चौकशीअंती त्याचे नाव नवीन ज्ञानबहाद्दूर नेपाळी असून पोलिसांना हे मुलाचे पालक असल्याची खात्री झाल्यानंतरच मुलगा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.