ऑपरेशन ऑलआऊट : चार दहशतवादी ठार, नागरिकांची जवानांवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये रजमानमध्ये पुकारण्यात आलेली एकतर्फी शस्त्रसंधी संपल्यापासून लष्कराचे केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट सुरू झाले आहे. शुक्रवारी पुलवाला जिल्ह्यामध्ये लष्करी जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

शुक्रवारी दुपारपासून पुलवामामध्ये तीन दहशतवादी लपून बासल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराने शोधमोहिम राबवली. दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते आणि काही लोकांना त्यांनी बंदीही बनवले होते. त्यामुळे लष्कराला कारवाईमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. दुपारपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. सायंकाळी उशीरा लष्कराला तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले.

कुपवाडात एक दहशतवादी ठार
शुक्रवारी कुपवाडामध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक सुरू असताना स्थानिकांनी लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली. यात १० लोक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.