मेक्सिको इतिहास घडविणार? नेयमारच्या ब्राझीलचे कडवे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॉस्को

फिफा वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा बाद फेरी गाठण्याचा पराक्रम मेक्सिको संघाने केलाय. मात्र प्रत्येक वेळी येथेच त्यांची गाडी अडली. चार लढती जिंकल्यानंतर पाचव्या लढतीत त्यांचा पराभव होतो असा मागील सहा वर्ल्ड कपमधील इतिहास आहे. मात्र आता उपउपांत्यपूर्व फेरीत पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझीलला हरवून मेक्सिकोला इतिहास घडवायचा आहे. गतजगज्जेत्या जर्मनीला गटफेरीत पराभवाची धूळ चारून मेक्सिकोने एकप्रकारे नेयमारच्या ब्राझीलला इशाराच दिला आहे.

अनुभव महत्त्वाचा ठरणार ?

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत केवळ दोन वेळा (१९७० व १९८६) उपांत्यपूर्क फेरी गाठण्याची कामगिरी मेक्सिको संघाने केली आहे. दुसरीकडे अनुभवी ब्राझीलचा संघ तब्बल १३ केळा उपांत्यपूर्क फेरीत खेळला आहे.

ब्राझीलचा चढता आलेख

या पार्श्वभूमीकर ब्राझीलला नमकून उपांत्य फेरी गाठणे मेक्सिकोला सहजासहजी शक्य होणार नाही. गटफेरीत भलेही ब्राझीलची सुरुवात संथ झालेली असली तरी उत्तरोत्तर त्यांच्या कामगिरीत सुधारणा होत अंतिम १६ फेरी गाठण्यात त्यांना यश आले आहे.

मेक्सिकोची सनसनाटी सलामी

सलामीच्या सामन्यात जर्मनीला १-० ने पराभूत करताना मेक्सिकोने आपल्या बचावाला गृहीत न धरण्याचाच इशारा स्पर्धेत भाग घेतलेल्या संघाना दिला होता. मात्र जर्मनीपाठोपाठ दक्षिण कोरियाला पराभूत करताना तिसऱ्या सामन्यात त्याना स्वीडनकडून पराभव पत्कारावा लागला होता.

स्वीडनविरुद्धच्या पराभवामुळे मेक्सिको नक्कीच सावध झाले असणार. ब्राझीलला रोखण्यासाठी त्यांना ब्राझीलच्या आक्रमण फळीतील फिलिप कोटिन्हो व स्टार खेळाडू नेयमार यांना रोखावे लागणार आहे.

आक्रमण आणि बचावाची जुगलबंदी

पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या संघांचे आक्हान संपुष्टात आल्याने ब्राझीलने आपल्या विजेतेपदाचा दावा अधिक बळकट केला आहे. जर्मनीला जोर का झटका देणाऱ्या मेक्सिकोला शह देण्यासाठी ब्राझीलला आक्रमक खेळ करावा लागणार आहे. उद्याच्या सामन्यात मेक्सिकोचा बचाव आणि ब्राझीलचे आक्रमण यांच्यातील जोरदार जुगलबंदी अपेक्षित आहे.