खेड, चिपळूणमध्ये पुरसदृश स्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर सुरु केला आहे. अतिवृष्टीमुळे खेड आणि चिपळूणात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दुपारी वशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरातील बाजारपुलावर आल्यामुळे एकच हाहाकार उडाला. दुपारनंतर पाणी ओसरले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास चिपळूणला पुराचा धोका आहे. खेड शहरातील जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

ratnagiri-photo-7-chiplun

 

चिपळूण शहरात वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आज दुपारी बाजारपुलावर पाणी आले. दुपारनंतर पावसाचा जोर कंमी झाला. त्यानंतर पाण्याची पातळी कमी झाली असली तरी संततधार पावसामुळे चिपळूण शहराला पुराचा धोका कायम आहे. जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४३.११ मिमी पडला़ त्यामध्ये मंडणगड ११० मिमी, दापोली १४५ मिमी, खेड १०२ मिमी, गुहागर ५६ मिमी, चिपळूण ११० मिमी, संगमेश्वर ७३ मिमी, रत्नागिरी ३८ मिमी, लांजा ८८ मिमी, राजापूर तालुक्यात ५७ मिमी इतका पाऊस पडला.

कैलास मानसरोवर येथे गेलेल्या पर्यटकांसाठी आवाहन
हिंदुस्थानच्या उत्तरेकडील झालेल्या अतिवृष्टीमुळे कैलास मानसरोवर येथे यात्रेसाठी गेलेले अनेक यात्रेकरु अडकले आहेत. याठिकाणी जर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणी यात्रेकरु गेले असतील तर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष ०२३५२ – २२६२४८ आणि हेल्पलाईन १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.