
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्रींसाठी अप टू डेट राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे पार्लरला जाणं, मेकअप करणं हे सर्व नेमानं आलंच. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वॅक्सिंग करणं चांगलंच महागात पडलं आहे. या अभिनेत्रीची त्वचा वॅक्सिंगनं होरपळली असून त्यावर लाल चट्टे पडले आहेत. या अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मधील कपिल शर्माची ऑनस्क्रीन बायको, प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना हीने अर्बन क्लॅप या कंपनीकडून सेल्फ ग्रुमिंगचं पॅकेज घेतलं होतं. या कंपनीकडून एक ब्युटीशियन सुमोनाच्या घरी आली होती. मात्र या ब्युटीशियनने केलेल्या वॅक्सिंगमुळे सुमोनाची त्वचा होरपळली असून तिच्या हातावर, काखेत लाल चट्टे उठले आहेत. सुमोनाने इंस्टाग्रामवर तिच्या हाताचे फोटो शेअर केले असून सोबत एक पोस्ट शेअर केली आहे.’माझ्या रेग्युलर पार्लरमध्ये मला अपॉईंटमेंट न मिळाल्याने मी अर्बन क्लॅप या सर्व प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या ब्युटीशियनला वॅक्सिंगसाठी बोलावलं. मात्र तिच्या वॅक्सिंगमुळे मला प्रचंड त्रास झाला आहे. मात्र या कंपनीची सर्व्हिस अत्यंत खराब असून त्यांच्या वॅक्सिंगमुळे माझी त्वचा सोलून निघाल्यासारखी झाली आहे. यांचं ब्युटिशियन अजिबात प्रोफेशनल नाहीत, अशी पोस्ट सुमोनानं शेअर केली आहे.
























































