विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेतीचा ध्यास घ्यावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिल कुचे

देशात सध्या वाढत असलेल्या शेतकऱयांच्या आत्महत्येसंदर्भात केंद्राचे नीती आयोगाने दिल्ली येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्रालय, कृषी अनुसंधान केंद्र व देशातील इतर राज्यांचे कृषी सचिव सहभागी झाले होते. या बैठकीत अमरावती येथील झीरो बजेट नैसर्गिक शेतीचे अभ्यासक व कृषी शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी वरील सर्वांना झीरो बजेट शेतीसंदर्भात आपले विचार मांडले. त्यांच्याशी अमरावती येथे दैनिक ‘सामना’ने केलेली बातचित.

 झीरो बजेट शेती व रासायनिक शेती, सेंद्रिय शेती यात फरक काय?
– जंगल हा निसर्ग आहे. निसर्गात विज्ञान आहे. ते विज्ञान अस्तित्वात नाही, परंतु अज्ञात आहे. ते शोधून काढणे म्हणजेच झीरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय, याचा उलगडा होऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास शहर व जंगलात मोठमोठी झाडे आहेत. या झाडांना कुणी पाणी देत नाही, फवारे मारत नाही किंवा रासायनिक खत दिले जात नाही. असे असतानाही ती मोठमोठी झाडे ताठ मानेने जगतात. याचाच अर्थ, आपल्या जमिनीतीच सर्व काही आहे. जमिनीच्या आत जेवणासाठी लागणारे सर्वच घटक आहेत. केवळ स्वयंपाक्याची गरज आहे. झीरो बजेट नैसर्गिक शेती नेमके हेच शोधून भरघोस उत्पन्न जमिनीतूनच मिळवून देऊ शकते.

 विज्ञान युगात झीरो बजेट शेती शक्य आहे काय?
– रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीत शेतकऱयांची जास्त लूट होते. कारण, अशाफ्रकारची शेती करताना महागडे फवारणीचे बियाणे वापरावे लागते किंवा फर्टिलायझर खतांचा वापर करावा लागतो. या तुलनेत झीरो बजेट नैसर्गिक शेती करताना खर्च कमी येतो. केवळ दहा टक्के पाणी व दहा टक्के विजेच्या माध्यमातून शेती केली जाते. यातून ९० टक्के शेतकऱयांचा खर्च वाचतो. यासोबतच झीरो बजेट नैसर्गिक शेती ही विषमुक्त आहे. विषमुक्त शेतमाल जमिनीतून निघाल्यामुळे त्याला ग्राहकांची फ्रचंड मागणी आहे. रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीचा गहू बाजारपेठेत २० ते २२ रुपये किलो मिळतो. तर झीरो बजेटच्या त्याच गव्हाला ३०ते ४० रुपये भाव मिळतो. अशाच फ्रकारे झीरो बजेट शेतीतून निर्माण झालेल्या उत्पन्नाचा भाव दुप्पट असल्यामुळे शेतकरी समाधानी झाला.

केंद्राच्या नीती आयोगाने झीरो बजेटची दखल घेतली काय?
– सेंद्रिय शेती व रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता घटते. त्यामुळे उत्पन्नात घट होते. परिणामी शेतकऱयांना आत्महत्या कराव्या लागतात. या दोन्ही शेती कालबाह्य झाल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी परवडणारी शेती आवश्यक आहे. म्हणूनच नीती आयोगाला झीरो बजेट शेतीबाबत माहिती मिळाली म्हणूनच नीती आयोगाने झीरो बजेट शेतीला फ्राधान्य दिले व त्याच पार्श्वभूमीवर कृषितज्ञांची बैठक घेतली. या बैठकीसाठीच आपल्याला बोलावण्यात आले. एका देशी गाईमुळे ३० एकर शेती केली जाते. काहीही विकत न आणता शेतीचे उत्पन्न मिळते. यासाठीच केंद्राच्या आपल्यासोबत संपर्क साधला.

उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे काय?
– जगात महागाई आहे. उद्योगपतींना श्रीमंत व्हायचे आहे. उद्योगात रोजगारदेखील आहे. असे असले तरी भविष्यात हे सर्व खोटे ठरणारे आहे. उच्च शिक्षित झाल्यानंतर बेरोजगारांचे लोंढे दिसतील. कारण हे सर्व शिकलेले बेरोजगार ‘तांत्रिक बाबू’ बनले आहेत. शेतीचे काम कुठेही शिकविले जात नाही. त्यामुळे शेतीचे काम करायचे नाही. आजच्या शिकलेल्या तरुणांमध्ये कौशल्य नाही. त्यामुळे शिक्षित तरुण शेतीपासून दूर गेला आहे.

अशामुळे नेमके काय होईल?
– फ्रत्येक व्यक्तीला पोटाची भूक आहे. मात्र शिकलेल्या तरुणांच्या डोक्यात भूक असली तरी त्यांच्या डोक्यात केवळ राख आहे. त्यामुळे उद्या हीच शिकलेली डोकी हातात दगड घेतील. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत हिंसा होण्याची भीती असून स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना काम द्यायचे असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. परंतु शेती करणे तरुणांना माहीत नाही. अशा वेळी गावा-गावात सुशिक्षित तरुणांना शेतीचे फ्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नीती आयोगाने घोषणाबाजी न करता झीरो बजेट नैसर्गिक शेती कशी उभी करता येईल. याचा अभ्यास करायला हवा व सध्या तोच सुरू असल्याचे दिल्लीच्या बैठकीत निदर्शनास आहे.

झीरो बजेट शेतीचा निष्कर्ष काय?
– झीरो बजेट नैसर्गिक शेती ही एक चळवळ आहे. या चळवळीत राजकारण किंवा धर्मकारण येत नाही. यातून मुक्त असलेल्या या चळवळीमुळे आंध्र फ्रदेश, कर्नाटक, हिमाचल या राज्यांत झीरो बजेट शेतीचे काम चालू आहे. आंध्र फ्रदेशमध्ये तर आतापर्यंत ३ लाख शेतकरी चळवळीत सामील झाले आहेत. येत्या ४ वर्षांत आंध्र फ्रदेशमधील सर्व शेती झीरो बजेट नैसर्गिक शेतीत येणार आहेत. असे झाल्यास ग्रामीण भागातून होणारे तरुणांचे पलायन रोखले जाईल. जगण्याचे शिक्षण दिले तर तो माणूस कुठेही जगतो म्हणूनच जमिनी सुपीक करणे आवश्यक आहे. जमिनीपासूनच उद्योग वाढविणेसुद्धा आवश्यक असून ग्रामीण भागातील तरुणांचे पलायन रोखण्यातसुद्धा यश फ्राप्त होऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशातील लोकसंख्येवरसुद्धा नियंत्रण आणणे आवश्यक आहे.