अखेर जीएसटी मधून सॅनिटरी नॅपकीन वगळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर मधून सॅनिटरी नपकी वगळावे अशी मागणी गेले अनेक दिवस होत होती. अखेर आज वस्तू आणि सेवा कर परिषदेत सॅनिटरी नॅपकीन्सना वस्तू आणि सेवा करमधून वगळण्याचा निर्णय झाला. दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. जीएसटी करप्रणाली जेव्हा लागू होणार होती तेव्हा पासून अनेक मान्यवर महिला आणि अनेक संघटनांनी याविरोधात आवाज उठवला होता.

महिलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या वस्तूवर कर आकारला गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. जानेवारीमध्ये मध्यप्रदेश मधील काही विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तशी मागणीही केली होती. या निर्णयामुळे गरीब व गरजू महिलांना फायदा तर होईलच, तसेच कमी पैशांत सॅनिटरी नॅपकीन निर्मिती करणार्‍या संस्थानांही याचा फायदा होणार आहे.