
सामना ऑनलाईन । मुंबई
अंधेरी भागातील एका तरुणाने आपल्या जॅग्वॉर कारने ४ पादचार्यांना उडवले. अपघातग्रस्तांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. चालकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्स घेतले होते आणि मद्यधुंदही होता. जखमींना कूपर आणि कोकिलाबेन इस्पितळात दाखल केले असून, जमावाने नशेत धुंद असलेल्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी चालकालाही तपासणीसाठी कूपर इस्पितळात दाखल केले आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Mumbai: A speeding Jaguar (vehicle) hit four people, injuring them and rammed into vehicles in Versova this evening. The driver was caught by people and handed over to police. The injured were taken to hospital. Further investigation is underway. https://t.co/0C8rfNThxq
— ANI (@ANI) July 23, 2018


























































