मध्य प्रदेशच्या पंचमढीत भाजपचा धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

पुढील वर्षाच्या प्रारंभीच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱया मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला आज मोठाच तडाखा बसला. पंचमढी छावनी परिषदेच्या निवडणुकीत सातपैकी सहा जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. केवळ एका जागेवर भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवार निवडून आला आहे.

पंचमढी छावनी परिषदेची निवडणूक रविवारी पार पडली होती. चार हजार ४९५ मतदार असलेल्या या निवडणुकीत ७९.२७ टक्के मतदान झाले होते. पंचमढी छावनी परिषदेत काँग्रेसला तब्बल २३ वर्षांनंतर घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.