
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथे आज पहाटे दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीनंतर या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
#JammuAndKashmir: Two terrorists have been gunned down in the encounter which started in Anantnag this morning. The encounter has concluded, combing operation is underway. The terrorists are yet to be identified. pic.twitter.com/reVmS0OkBc
— ANI (@ANI) July 25, 2018
अनंतनाग जिल्ह्यातील पांबोरा भागात गस्त घालणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले होते. सुदैवाने त्या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर केंद्रीय राखील पोलीस दल, जम्मू कश्मीर पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू केली होती. या मोहीमेदरम्यान दहशतवादी व जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
























































