दाढीमुळे करीना सैफमध्ये दुरावा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान हे बॉलिवूडमध्ये एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. मात्र आता या दोघांच्या नात्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली असून करीना सैफ अली खानला टाळत असल्याचे समोर आले आहे. करीनाने सैफला किस करायला नकार देत असून ती सैफला स्वत:पासून लांब ठेवत आहे.

सैफने एका चित्रपटासाठी सध्या दाढी वाढवली असून त्यामुळे करीनाने त्याला स्वत:पासून लांब राहण्यास सांगितले आहे. करिनाने तिला तसेच तैमूरला देखील किस न करण्याची ताकीद सैफला दिलेली आहे, सैफने स्वत: एका मुलाखतीत याबाबत सांगितले आहे. ‘मी तैमूरला माझ्या गालावर किस करायला सांगितली तर तो मला हाताने लांब करतो, करीनाचेही तसेच काहिसे आहे. सध्या या दाढीमुळे ना मी त्यांना किस करू शकत आहे ना ते मला’ असे सैफने या मुलाखतीत सांगितले आहे.