मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मराठा समाजाला आरक्षच्या मागणीने राज्यात जोर धरला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून मराठा क्रांतीच्या ६ आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

sholay-style-protest-for-ma

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्यातच शहरातील पुंडलीकनगर भागात रमेश गायकवाड, सचीन मिसाळ, विशाल पवार, संतोष काळे, अशोक मोरे, सुर्यवंशी आदींनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी जमली असून माजी नगरसेवक अभिजीत देशमुख हे आंदोलनकर्त्यांना समजविण्यासाठी पाण्याच्या टाकीवर गेले आहे.